top of page

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत प्रसिद्ध निसर्गचित्रकार,श्री.भागवत सपकाळे सर व सुप्रसिद्ध सुलेखनकार,श्री.मनोहर बाविस्कर सर यांच्या चित्रांचे प्रदर्शन

MUMBAI

7 अग॰ 2023

दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान सुप्रसिद्ध निसर्ग चित्रकार श्री.भागवत सपकाळे सर व सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री. मनोहर बाविस्कर सर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई एअरपोर्टचे मुख्य Regional Executive Director श्री. जे.टी राधाकृष्ण,माजी सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय, महाराष्ट्र शासनाचे श्री. रामचंद्र डी.संखे,इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशनचेे सीईओ श्री डॉ नारायण ए बी अय्यर,एअरपोर्ट हायस्कूल विलेपार्ले,माजी प्राचार्य श्री एस पी पांडे सर या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे सर एअरपोर्ट हायस्कूल अंधेरी येथे कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत. यांची निसर्ग चित्रे व्यक्तींना आपल्या भावनांच्या जवळ नेण्याचे प्रयत्न करतात. अतिशय तंतोतंत निसर्गाची रूपे सरांनी आपल्या चित्रांमधून मांडली आहेत. धो धो कोसळणारा धबधबा,समुद्रातील उंच उंच लाटा, कमाळाचे पानातील सौंदर्य सरांनी अतिशय छान प्रकारे चित्राद्वारे मांडले आहे भागवत सपकाळे सरांचे जल रंगातील निसर्ग चित्रे प्रसिद्ध आहेत. भागवत सपकाळे सर यांनी कोरोना काळातील सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांनी पाच तासात 200 निसर्ग चित्र तयार करण्याचा विक्रम नोंदवला आहे. म्हणून त्यांना भारत वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले

सुलेखन कार श्री मनोहर बाविस्कर सरांचे पेन्सिल वर्क* अप्रतिम आहे. मुंबई येथे हिमालया हायस्कूल बोरीवली येथे कलाशिक्षक पदाची नोकरी सांभाळून आपले कलेचे प्रदर्शन आयोजित करणे.विद्यार्थ्यांना कलेविषयी मार्गदर्शन तसेच आपल्या कलेबद्दल सतत नाविन्य निर्माण करण्यासाठी श्री मनोहर बाविस्कर प्रयत्नशील असतात.सध्या रंगांची दुनिया खुप एनजॉय करत आहे..... स्केचेस काढताना, रंग-शेडिंग करताना खुप मस्त वाटते असेच पेन्सिलीचे मजा करताना पेन्सिल आर्टिस्ट श्री मनोहर बाविस्कर यांनी विविध रंगीत पेन्सीलीच्या माध्यमातून सुंदर रीतीने चित्र तयार केलेली आहे.

मी माझ्या केळफुलाच्या चित्रात याच (स्टेड्लर) वापरल्यात आहेत हे तुम्हाला प्रदर्शन भक्तांना ते सर्व जाणून येणारच आहे. सर्व कला प्रेमींना या प्रदर्शनात खूपच सुंदर पेन्सिलीचे चित्र बघायला मिळणार आहेत याचा आस्वाद सर्वांनी नक्कीच घ्यावा  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • YouTube

अल्बर्ट आइन्स्टीन 

साहित्य समाजहम भारतीयों के आभारी है,
जिन्होने हमें गिनना सिखाया
जिसके बिना किसी भी तरह की
वैज्ञानिक खोज सम्भव ही नहीं थी.

© 2023 by Prawasi Chetana 

bottom of page